प्रतिनिधी / कोल्हापूर
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष समरजीत घाटगे ६ नोव्हेंबर पासून जिल्हा दौऱ्यावर निघणार आहेत. यावेळी ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेणार आहेत. मंगळवारी त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी माजी आमदार अमल महाडिक, माजी अध्यक्षा शौमिका महाडिक, विजय भोजे किसान सेलचे भगवान काटे, अजिंक्य इंगवले विजय भोज आदी उपस्थित होते.
सध्या शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्यापर्यंत पोहचणे गरजेचे आहे. सरकारकडून दखल घेतली नाही. आम्ही सरकारला याकडे लक्ष द्यायला भाग पाडू दौरा संपण्याच्या पूर्वी मदतीचा निर्णय घेण्यात यावा अशी अपेक्षा आहे अन्यथा त्यांच्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला करवीर तालुक्यातील चिंचवाड येथून दौर सुरू होणार आहे.
असा असेल दाैरा
६-११-२०२०- चिंचवाड ता. करवीर, गोरंबे व सोनाळी ता. कागल
१२-११-२०२० राधानगरी व भुदरगड
१९-११-२०२० पन्हाळा व शाहूवाड