काही लोकांची नखे इतकी मऊ असतात, की त्यांची वाढ झाल्याबरोबर आपोआपच त्यांचे तुकडे पडू लागतात. पण नखांचे तुटणे हे गंभीर आजारांचे लक्षण देखील असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका.
- अशक्तपणा : बहुतेक जणांमध्ये अशक्तपणा अर्थात ऍनिमियाची समस्या आढळते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास ही समस्या निर्माण होते. अशक्तपणा दरम्यान बर्याच वेळा नखे कमकुवत होतात आणि ती मोडतात.
- यकृताच्या समस्या : नखांचा रंग बदलणे हे सहसा यकृतच्या समस्येशी संबंधित असते. त्यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष करु नका.
- मज्जासंस्थेसंबंधी समस्या : कधीकधी नखे तुटण्याची समस्या आपल्या पेशी आणि मज्जासंस्थेमध्ये बिघाड झाल्याचे देखील दर्शवते. वास्तविक, पेशी तयार करण्यासाठी आणि मज्जातंतू निरोगी ठेवण्यासाठी शरीराला ‘व्हिटामिन बी12’ची आवश्यकता असते. या व्हिटामिनच्या अभावामुळे नखे तुटण्याची समस्या देखील उद्भवते.
- प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता : प्रथिने आणि कॅल्शियमची कमतरता असल्यासही नखे तुटण्याची समस्या उद्भवते. ही समस्या वेळेत समजली नाही तर हाडे, स्नायू आणि त्वचेशी संबंधित सर्व समस्यांचा धोका असतो
उपाय काय?
- नखे तुटण्याच्या समस्येच्या मुळाशी असणारी कारणे जाणून घेतल्यानंतर त्यानुसार यावरील उपायही जाणून घेऊया.
- प्रथिनेची कमतरता दूर होण्यासाठी मोड आलेली मूग डाळ व हरभरा खा. शरीरातील लोहाची कमतरता दूर करण्यासाठी डाळिंब, बीट, पालक, केळी, मेथी, अंजीर या घटकांचा आहारात समावेश करा.
- ‘व्हिटामिन बी12’साठी, डॉक्टरांच्या निर्देशानुसार डाएट अथवा सप्लीमेंट घ्या. त्याच वेळी कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी आहारात दूध, दही, चीज या दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा. नखांवर तेलाने मालिश करा. बरेचदा कोरडी पडल्यामुळे देखील नखे मोडतात. अशा वेळी ऑलिव्ह किंवा एरंडेल तेलाने नखांचा नियमित मसाज करा. तसेच भरपूर पाणी प्या.
– डॉ. संजय गायकवाड