- प्राथमिक पातळीवर सामान्य मसचा उपचार हा औषधांनी केला जातो. परंतु त्यानंतर वाढलेल्या मसवर लेसर ट्रिटमेंट किंवा शस्त्रक्रिया हा एक पर्याय आहे.
- त्वचेवर मस येणे ही सामान्य गोष्ट. काहीवेळा मसचा आकार वाढतो. परंतु त्याकडे दुर्लक्ष करतो. प्रत्येक वेळी ही बाब आरोग्यासाठी चांगली नाही.
- शरीरावर वेगवेगळ्या भागात लहान मोठे आकाराचे तीळ, पुरळ येतात. आकार सामान्यांपेक्षा मोठा असल्यास त्यास मस म्हणतो. मस हा एक त्वचारोग आहे.
- मस हे मोहरीच्या दाण्यापासून वाटाण्याच्या आकारांपर्यंत मोठा होऊ शकतो.
- साधारणपणे मस येण्यामागचे मुख्य कारण म्हणजे ह्यूमन पॅपिलोमा संसर्ग होय. परंतु अन्य कारणांमुळे देखील मस येऊ शकते. कारण कोणतेही असो, त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. काही बाबतीत अनुवांशिकता देखील असू शकते.
- एखादी व्यक्ती मसबाबत तक्रार करत असेल तर डॉक्टर सर्वप्रथम कौटुंबीक पार्श्वभूमी विचारतात. वाढते वजन आणि मधुमेहामुळे शरीरावर मस येऊ शकते. अनियमित जीवनशैली हे एक प्रमुख कारण मानले जाते.
- आजकाल लहान मुलांच्या अंगावरही मस दिसू लागले आहेत. मसचे अनेक प्रकार असू शकतात. जसे की फ्रेकल्स, मिलेनोसायटिक, वेलगोरिस आदी. मस हे तीळाएवढे असणे सामान्य मानले जाते. बहुतांश मस हे धोकादायक नसतात. काहीवेळा शरिरावर भूरकट रंगाचे मस दिसतात. त्वचेवर मांसाची लहान गाठ असते. आपण बोटाने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. मस मुलायम असतील तर ते सामान्य मसच्या श्रेणीत येतात. त्यापासून कोणताही धोका नसतो. परंतु ते कडक आणि काळे असतील तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
- काही वेळा रक्त साखळल्याने देखील काळे चट्टे पडतात. मसचा रंग काळा असेल आणि त्याचा आकार सतत वाढत असेल तर ती गोष्ट चिंताजनक ठरू शकते. मस आल्यानंतर कोणताही प्रयोग करू नका. संसर्ग वाढण्याचा धोका राहू शकतो.
- आपल्या शरीरावर तीळ किंवा मस वाढत असतील तर जीवनशैलीत सुधारणा करायला हवी. मस दुखत असतील तर डॉक्टरांना दाखवणे अत्यावश्यक आहे. योग्य प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिनचे सेवन करणे गरजेचे आहे. त्याचवेळी रिफाइंड, प्रोसेस्ड फूड, साखर यांचे अधिक प्रमाणात सेवन करू नये.
- मस होण्यास सर्वात मोठा घटक हा ह्यूमन पिपिलोमा संसर्ग आहे. हा संसर्ग वेगाने पसरतो आणि ते शरिरात पोचल्यानंतर त्याची खास लक्षणे देखील दिसत नाहीत. हा एक प्रकारचा परजीवी घटक आहे. तो त्वचेवरच्या भागावर परिणाम करतो. गंभीर स्थितीत त्वचेचा कर्करोग होण्यास कारणीभूत ठरू शकतो. परिणामी त्वचेशी निगडीत आणखी काही समस्या निर्माण होऊ शकतात.
– डॉ. महेश बरामदे