समांथा रुथ प्रभूचा आगामी पौराणिक चित्रपट ‘शंकुतलम’चा फर्स्ट लुक समोर आला आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर याचे छायाचित्र शेअर केले आहे. निसर्गाची प्रेमळ शंकुतला फ्रॉम शंकुतलम असे तिने यात नमूद केले आहे. समांथाच्या या चित्रपटाची पटकथा गुनासेखर यांनी लिहिली असून तेच दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळत आहेत.
समांथाची महाकाव्य प्रेमगाथा ‘शांकुतलम’च्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. शांकुतलमच्या पोस्टरमध्ये समांथाने पांढऱया रंगाचा पोशाख परिधना केला असून यात ती एका राजकन्येच्या वेशभूषेत दिसून येतेय. याचबरोबर अभिनेत्रीच्या चहुबाजूला हरिण, ससा, बदक, मोर इत्यादी अनेक प्राणी दिसून येत आहेत. पूर्ण निसर्ग अभिनेत्रीचे सौंदर्य न्याहाळत असल्याचे पोस्टर पाहून वाटू लागते. शांकुतलममधील अभिनेत्रीचा हा लुक प्रत्येकाला मोहित करणार आहे.
समांथा नेहमीच पौराणिक कथा, ऐतिहासिक घडामोडी आणि राजा आणि राणींच्या जगाद्वारे प्रभावित राहिली आहे. तिचा हा पहिला पौराणिक चित्रपट असून यात ती राणी शकंतुला देवीची भूमिका साकारत आहे. अल्लू अर्जुनची मुलगी अल्लू अरहा यात राजकुमार भरतच्या बालरुपात दिसून येणार आहे.