नागा चैतन्यकडून एक रुपयाही नको
दक्षिणेतील लोकप्रिय दांपत्य नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू अखेर विभक्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून समांथा आणि नागा चैतन्य यांच्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा सुरू होती. दोघेही घटस्फोट घेणार असल्याचे वृत्त होते. अखेर या चर्चांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. समांथा आणि नागा चैतन्यने सोशल मीडियवर एक पोस्ट शेअर करत विभक्त होत असल्याचे जाहीर केले आहे. विवाहाच्या जवळपास 4 वर्षांनी त्यांचे नाते संपुष्टात आले आहे.
नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबीयांकडून तब्बल 200 कोटी रुपयांची पोटगी समांथाला ऑफर करण्यात आल्याचे समजते. तर समांथाने या पोटगीला नकार दिल्याचे समोर येत आहे. नागा चैतन्यच्या कुटुंबीयांकडून एक रुपया देखली नको असे तिने स्पष्ट केले आहे. समांथाने अभिनय कौशल्यावर चित्रपटसृष्ठीत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. समांथा आता कामावर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचे समजते. नागा चैतन्य हा प्रसिद्ध कलाकार नागार्जुनचा मुलगा आहे.