प्रतिनिधी / बेळगाव
संविधानकर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती प्रशासन आणि समाजकल्याण खात्यातर्फे साधेपणाने करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळय़ाला जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच आमदार अनिल बेनके यांनीसुद्धा पुष्पहार अर्पण केला.
यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दर्शन एच. व्ही. अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर, महानगरपालिकेचे आयुक्त जगदीश, दलित नेते मल्लेश चौगुले आदी उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर आचारसंहिता लागू असल्याने यंदा आंबेडकर जयंती साधेपणाने आचरण्यात आली.