राजमाता जिजाऊ, विवेकानंद जयंती साजरी : संकेश्वर, निपाणी, मांजरी, अकोळ, कणगलेत विविध कार्यक्रम
वार्ताहर/ मांजरी
भारतीय संस्कृतीला आपले विचार व आचार यातून टिकवून ठेवण्याचे कार्य स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ या महान व्यक्तिमत्वांकडून घडले आहे. आदर्श आचरण, उत्तम चारित्र्य, युवा पिढीला मार्गदर्शन हे स्वामी विवेकानंद यांच्याकडून शिकता येईल. तर करारी बाणा, व्यक्तिमत्व घडवणारे विचार व संस्कार हे राजमाता जिजाऊंकडून शिकण्यासारखे आहे. सध्या समाजाला अशा आदर्श व्यक्तिमत्वांच्या विचारांची गरज आहे, असे आण्णासाहेब यादव यांनी सांगितले.
येथे स्वाभिमानी मराठा युवा मंच यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात दोन्ही महान व्यक्तींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन शशिकांत पाटोळे तर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन शितल यादव यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन पोपट लामकाने यांच्या हस्ते करण्यात आले. बबन भिलवडे व तानाजी लगळे यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
यावेळी मोहन लोकरे, अबू मकानदार, परशुराम तोरसे, अशोक काळविरे, दिलीप पवार, रामचंद्र कदम, समशेर मत्तेभाई, मनोहर लंबुगोळ, बाळासाहेब पवार, मारुती शेंडुरे, शंकर तोरसे, शेखर काडापुरे, नामदेव पाटोळे, नरवीर तानाजी युवक मंडळ, आदर्श युवक मंडळ, संभाजी राजे प्रति÷ान, ठाकरे ग्रुपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नितीन जाधव यांनी स्वागत तर चंद्रसेन कदम यांनी आभार मानले.
संकेश्वरात विविध ठिकाणी कार्यक्रम
संकेश्वर : येथे मित्रमंडळ, श्रीराम सेना हिंदुस्थान, हिंदुराष्ट्र सेना, शिवप्रतिष्ठान व सर्व शिवप्रेमी युवकांच्यावतीने शिवाजी चौकात जिजामाता व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा आदर्श आजच्या युवा पिढीने व महिलांनी घेणे महत्त्वाचे आहे. जिजाऊंनी अन्यायाविरुद्ध लढण्याची शिवबांना प्रेरणा दिली. त्यांनी शिवाजी महाराज यांना रयतेवर व जनतेवर होणारा अन्याय संपवायचा असेल तर स्वराज्य उभे केले पाहिजे अशी शिकवण दिली, असे जयप्रकाश सावंत यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक, डॉ मंदार हावळ, उद्योजक अभिजीत कुरणकर, शिवपूत्र अरभांवी, समीर पाटील, अमोल अटक, सुभाष कासारकर, पुष्पराज माने, संतोष टिक्के, महेश दवडते, इंद्रजित शेंडे, कन्हय्या भोसले, दत्ता जाधव, सचिन मोकाशी, प्रशांत कंबळकर आदी उपस्थित हेते.
पतंजलीतर्फे जयंती साजरी
पतंजली योग समिती यांच्यावतीने राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती महालक्ष्मी समुदाय भवन येथे साजरी करण्यात आली. जिजामाता प्रतिमेचे पूजन शैलजा जेरे व स्वामी विवेकानंद प्रतिमेचे पूजन मल्लापा कुरबेट्टी यांनी केले. कार्यक्रमास पुष्पराज माने, परशुराम कुरबेट्टी, जयेंद्र धबाले, श्रीनिवास कोळेकर, अजय कुरबेट्टी, रावसाहेब कंबळकर, प्रमिला देसाई, विद्या नाईक, निर्मला कमतगी, मीनाक्षी वेसनेकर उपस्थित होते.
कणगलेत जिजाऊ, विवेकानंद जयंती
कणगले : लक्ष्मीपती नरसिंह देवस्थानात राष्ट्रमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद, त्यागवीर लिंगराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन पंचायत सदस्य जोतिबा पाटील व सुनील मगदूम यांच्या करण्यात आले. कमते गुरुजींनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमास बाळासाहेब पाटील, नितीन पलसे, सुनील कमते, मोहन पाटील, गंगाधर पट्टणशेट्टी, पद्मराज कमते, आण्णासाहेब बसवण्णावर आदी उपस्थित होते. दत्तात्रय खाडे यांनी आभार मानले.
अकोळ येथे विवेकानंद, जिजामाता जयंती साजरी
अकोळ : येथील शिवगर्जना मंडळाच्यावतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. धनाजी चव्हाण व युवराज भारमल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. पत्रकार मोहन बन्ने यांनी श्रीफळ वाढविला. यावेळी संतोष बन्ने व संदीप भारमल यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या कार्याची माहिती सांगून त्यांच्या आचार-विचारांचे संगोपन करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी सुनील पाटील, राहुल देवडे, श्रीशैल बन्ने, अमोल चव्हाण, सुरज संकपाळ, आकाश पाटील, सचिन चव्हाण, महालिंग वाळके, दीपक परीट आदींसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत संकेत चव्हाण यांनी तर संतोष संकपाळ यांनी आभार मानले.
निपाणीत राजमाता जिजाऊ जयंती
निपाणी : येथील राजा शिवछत्रपती भवन आवारात कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशन तसेच शिवप्रेमींच्यावतीने राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी विठ्ठल वाघमोडे, रमेश भोईटे, रविंद्र इंगवले, जयराम मिरजकर, सुंदर साळुंखे, उज्ज्वला सातपुते, स्वाती दबडे, कांचन खराडे, वैशाली कदम, मालुताई पोवार, शिल्पा पाटील यांच्यासह फेडरेशनचे सदस्य, शिवप्रेमी, महिला उपस्थित होत्या.
मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळ राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती मध्यवर्ती शिवाजी तरुण मंडळातर्फे साजरी करण्यात आली. याप्रसंगी पूजा साळुंखे, गीता शिंदे, आसावरी कांबळे व सुवर्णा पोवार यांनी प्रतिमेचे पूजन केले. निलेश पावले व राहुल दळवी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी बोलताना अध्यक्ष उदय शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी नितीन साळुंखे, पांडुरंग भोई, नितीन शिंदे, संजय माने, सुनील शेलार, चेतन शिंदे, शैलेंद चव्हाण, प्रथमेश शिंदे, सचिन पोवार, शितल बुडके, संदीप केसरकर, शामराव पाटील आदी उपस्थित होते.