प्रतिनिधी / पणजी
समाज कल्याण खत्यातर्फे देण्यात येणारी दयानंद सामाजिक योजनेची रक्कम आणि निवृत्तीवेतन लॉकडाऊन असल्याने वेळेत झाली नाही. दयानंद सामाजिक योजनेचे मार्च आणि एप्रिल महीन्याचे पैसे खत्यातर्फे आठ दिवसात योजना धारकांच्या खात्यात जमा करण्यात येईल. गोवा इलेक्ट्रोनिक लिमिटेडने केलेल्या सर्वेक्षणात काही योजनाधारकांची माहिती चुकीची असल्याचे आढळले तर काहींची माहिती अर्धवट होती. अशा सर्वांना नोटीस पाठविण्यात आली असल्याची माहिती समाज कल्याण विभाग गोवाचे अतिरिक्त सहाय्यक संचालक ताहा हझिक यांनी दिली. ताहा हझिक यांनी सांगितले की ज्यांना नोटीस पाठविण्यात आली आहे त्यांनी आपली अचूक माहिती विभागाला द्यावी. 2300 लोकांचे निवृत्तीवेतन अचूक माहिती नसल्याने थांबविण्यात आले आहे. त्यांनी आपली माहिती विभागाकडे दिली की लगेच त्यांना पैसे देण्यात येईल. आम्ही कुणाचेही पैसे थांबविले नाही. सर्व योजनाधारकांच्या खात्यात ठरलेली रक्कम विभागातफ्xढ देण्यात येईल. लॉकडाऊनमुळे ज्यांना पणजी कार्यालयात येणे शक्य होत नाही त्यांनी आपली माहिती socialwelfare@rediffmail.com या ईमेलवर पाठवावी.