बेळगाव : बेळगाव भाजपतर्फे सौरभ सावंत यांच्यावतीने समादेवी गल्लीतील समादेवी मंदिरात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, दीपा कुडची, युवा मोर्चा उपाध्यक्ष संजय पाटील, युवा मोर्चा सदस्य श्रेयस नाकाडी, आदर्श नुली उपस्थित होते. बेळगाव ब्लड बँकेचे डॉ. व्ही. के. तेलसंग, जनसंपर्क प्रमुख विनायक मेणसे यांच्या सहकार्याने हे शिबिर झाले. शिबिरात 25 हून अधिक जणांनी रक्तदान केले.
Previous Articleसेवा संस्थेतर्फे जीवनावश्यक साहित्याचे किट वितरण
Next Article काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.