सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक : आप्पाचीवाडी-कुर्ली यात्रेत भाविकांची उपस्थिती : मंदिर परिसरात भंडाऱयाची उधळण
मेघराजाची तुम्ही वाट बघत राहशीला, उन्हाळय़ाचा पावसाळा, पावसाळय़ाचा उन्हाळा होईल, धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल. काळय़ा खडकाच्या लाहय़ा उडतील, खडकाच्या माळाला तुम्ही धडका खाशीला, कोल्हापूरच्या देवीला मो”ं संकट पडलंय, रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतया, परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करतील, साताऱयाच्या गादीवर फुलं पडतील, शेती व्यवसायावर संकट येईल, पावसाअभावी पेरणी कामाचा ऋतुमान बदलत जाईल. हाय ही भाकरीवरची भाजी हाय, सांभाळून खावा. जगातील तापमानाचा धोका वाढत जाईल, जंगलात आग लागंल, वणवा पेटंल, वन्यजीवन अडचणीत येईल, औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील, भारत देशात समान नागरी कायद्याचा हक्क येईल, गोरगरीब जनता सुखी राहील, आनंदात जगंल, तोरण बांधतील, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक सिद्धार्थ डोणे महाराज यांनी कथन केली.
महेश शिंपुकडे, निपाणी
कर्नाटक-महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथांच्या अश्विन यात्रेला 21 रोजी सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यात्रा स्थानिक भाविकांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करत पार पडली. नाथांची पहिली भाकणूक 24 रोजी पहाटे झाली. सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या दरबारात येत्या काळातील होणाऱया बदलांचे भाकीत कथन केले.
मेघयान मळा माझ्या आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा. हाय मेघ उदंड हाय, बांधा आड बांध, शिवा आड शिव. मेघाची कावड गैरहंगामी उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाया, लागलाय त्यो दुनिया न्याहाळू लागलाय. त्याच्या म्हागं अंधार, म्होरं अंधार पडलाया. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय, नऊ दिन नम सात दिन भोंब बरोबर हाय. भोंबच्या पुनवेला वाडीकुर्लीच्या खडकाच्या माळाला झेंडा मिरवल, भोंबेच्या पुनवेला माझा सोहळा निघतोया, चिंचेच्या बनात मी खेळायला जातोया. कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, वाडीकुर्लीच्या खडकाच्या माळाला फारपूर्वी काळाला आशान टाकलया, निशाण रोवलया.
अगा येगा बाबा, डोण्या तू प्रधाना, अगा येगा बाबा धरतो हेगडी प्रधाना, जळा यान स्थळा, माझ्या पूर्वीच्या हेल्लाळा, जोती यान जोती डोंगराचा बालपणाचा सोबती, काढावी पोती काढावं काढावं पोती पुराण काढावं, वाचून दावावं सभेत बोलावं, खोटं तू बोलशील खरं मी करीन, शब्दा सादर राहीन, पेरल ते उगवल. शेवटाला लावीन, चालवीन क्रिया चालवीन, डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, वस घडवीन. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय हाय, आप्पाचीवाडी-कुर्ली भूमिचा महिमा अगाध हाय, जगात झेंडा मिरवल, भोगीच्या पुनवेला माझा सोहळा निघतोय, शेजारच्या बनात खेळायला जातोय. खडकाच्या माळाला माझी विश्रांती हाय.
आप्पाचीवाडी-कुर्ली पुण्यभूमी प्रति शिर्डी व्हईल
खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरलाया. कांबळय़ाच्या खोळत मी फुले माळत बसलोया. बसलोया बसलोया मी पृथ्वीची घडामोड करत बसलोया, आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी क्हईल. तिरुपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी, वाडीकुर्ली आगार इथं नाथांचा भरलाय नाथांचा दरबार. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, महिमा जगात वाढत राहील. वाडीकुर्लीच्या पुजारी, मानकऱयासनी माझा आशीर्वाद हाय, वाडीकुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बघशीला.
साधल तो सज्जन
हाय धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. पिंजऱयातील राघू भाषण करंल, चित्त देवाचं, पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारील. तिसरा मोगरा राज्य करील, तुम्ही बगाल आश्विनी, भरणी, कात्या, वॅढतिका, रोहिणी मृगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मृग मिरवेल कुरी, मिरवेल कोकण बंधारी मिरवेल. बांधा आड बांध, शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधल तो सज्जन, हातात भाकरी, खांद्यावर चाबूक, साधल तो सोबती.
जमिनीतलं धान्य बहुत बेमानं राहील
सरता मृग निघता आडद्रा मध्यम फाटय़ाचा पेरा होईल. सरता आडद्रा निघता तरणा, अल्लम दुनियेचा पेरा होईल, कुरी धाऱयाला बसंल, रोहिणीची पेरणी त्याला हादक्याची पुरवणी क्हईल. देवधान्य बहुता उदंड पिकल, राजधान उदंड पिकल. धारणं धुरणं जगाचे जगवनं. खळय़ाच्या का”ाr 3 मापटी म्हणतील, 3 मापटी म्हणता शेरावर येईल. चढंल उतरंल, शेर म्हणता मापटय़ा चिपटय़ावर येईल. खरीप भोरीप बहुत उदंड पिकल, जमिनीतलं धान्य बहुत बेमानं राहील, तांबडी रास मध्यम पिकल, मोलानं विकल, काळी रास सुफळ जाईल, मूग कडधान्य तूर उदंड पिकल.
चोऱया-माऱया वाढत राहतील
सर्वसामान्य माणूस खात राहील. दीड महिन्याचं धान्य पिकल. पांढरी रास उदंड पिकल, गोरगरिबाला पुरावा करील, तांबडी कळी मध्यम पिकल. ती ताजव्यातून जोकल, कागदातून विकल, धान्य दारात, वैरण कोन्यात, वैरण सोन्याची होईल, संभाळून ऱहावा, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, धान्या दुनियाची वैरण काडीची चोरी मारी वाढत राहील. कानानं ऐकाल, डोळय़ानं बघत राहशीला, सांभाळून ऱहावा. गक्हाची पेंडी मध्यम पिकल. पिकल ती बांध आड बांध शिवा आड शिव पिकल.
भूमिमाता दुभंगून जाईल
12 वर्षाची मुलगी आई होईल, कानानं ऐकाल, डोळय़ानं बघशीला, उगावत्या सूर्याला संकट पडलया, भूमिमाता दुभंगून जाईल, भूमिमातेतून भोंग निघतील. माणसाच्या जीवाला हानी करतील, पारव फूल सुफळ जाईल, पिवळं फूल उदंड पिकल, मोलानं विकल, पांढरं फूल मध्यम पिकल, तांबड फूल उदंड पिकल, देवा धर्माला पुरावा करील, लुगडी घोंगडी कपडा, लत्ता माणसाला फुकाचा होईल.
दुनियेत अंधार पडंल
सरकी फुकाची, मेंढी मोलाची होईल, जग दुनियेत मो”ं एक नवल होईल, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल, होईल त्याची कीर्ती होईल. आहे म्होरंच भविष्य आहे. मेंढीच्या मेंडक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माउली मेंडक्याची सुखाची सावली होईल. मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी होईल. मेंढीबाईला कलम जडंल, मेंढीपासून वेगळी पैदास होईल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल, मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. मेंढीबाई पालखीतून मिरवंल, धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मारंल. कळपातला बकरा कळपात लढंल, फुटेल मुढा फुटेल, कालवेल दुनिया कालवेल, कालवून जाईल, मायेचं लेकरू मायेला ओळखायचं नाही. गाईचं वासरु गायीला भेटणार नाही. पडेल जग दुनियेत अंधार पडंल.
रसाला धारण, माणसाला मरण येईल
कारखाना मालक आनंदात राहील, साखरेचा भाव काही दिवस तेजीत राहील, साखरेचं पोतं तेजी-मंदीत राहील, गुळाचा भाव वाढंत राहील, साखरंचं पोतं मोलानं इकल, मांडवाचे दारी 2600 म्हणतील, 2600 म्हणता 2500 वर येईल. 2500 म्हणता 2400 वर येईल. 2400 म्हणता 2300 येईल, चढंल, उतरंल. तंबाखूची पेंडी मध्यम पिकल. तंबाखूचा भाव गगनाला भिडंल, तंबाखूपासून तरुणपिढी, घरदार बरबाद होतील. माणसाला आजार लागंल, रस भांड उदंड पिकल, रसाला धारण माणसाला मरण येईल, उसाचा काऊस होईल, सडकंवर पडंल, औषधाला मिळणार नाही, उसासा”ाr देशात आणि राज्यात आंदोलन छेडतील, गावोगावीöखेडोपाडी दंगा-धोपा होईल, जाळपोळ होईल.
पंच लोक लाच खाऊन भांडणं लावतील
नऊ वर्षाची मुलगी भरतार मागंल, दागिने-पैसे माणसाला घातक “रतील, घरातून गेलेला माणूस परत येईल म्हणून आशा धरू नकोसा, तांबडं धान्य मोलानं विकेल, सोनं काही वर्षानं फुकाचं होईल, चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात मो” बिघोड लागेल, राजकारणात सट्टाबाजार चाललाया, राजकीय नेते सत्तासंपत्ती गोळा करतील, देशाचा बाजार मांडतील, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटय़ा उडय़ा मारतील. तोंडघशी पडतील. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. स्त्रीवर्ग राजकारणात मो”ाr बाजी मारेल, राजकीय नेत्यांची खुर्ची काढून घेतील, नोकरवर्ग समाज खाईल, बारा महिने लग्नकार्य चालतील. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागंल. पंच लोक दोन्हीकडील लाच खाऊन भांडणं लावतील. पैशाच्या जोरावर माणसाला न्याय मिळणार नाही. खऱयाचं खोट अन् खोटय़ाचं खरं करतील, होतील भूकंप होतील, कृष्णेच्या काठाला बांगडय़ा फुटतील, फुटतील 9 लाख, व्हावतील रक्ताचे पाट व्हावतील.
कागदाचा घोडा माणसाला खूळ लावंल
घरातील लक्ष्मी दडून बसलीया, रानातील लक्ष्मी पळून खेळतीया, कोकण्यातील बसक्या सरहद्दीवर येईल, देशातील बसक्या सरहद्दीवर येईल. सरहद्दीवर दोघांची टक्कर लागेल. शेतासा” देशात खून पडतील, कागदाचा घोडा माणसाला खूळ लावंल, काळी कांडी पोटाशी जतन करावी, एक औत चौघात होईल, बारा बैलाचा तिवडा रोवलाया, मदनातला बैल उफराटा फिराया लागलाया, बसक्याचं शिंगाट सोन्याचं होईल. बसक्या राजाची तुम्ही सेवा करावी, कुळंब्याच्या बाळाला विचार पडलाया, जग दुनियेत तीन राजे हायेत, एक राजा मेघराजा, दुसरा राजा बसक्याराजा, तिसरा राजा कुळंबीराजा, कुळंब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय.
थराचा धोंडा थराला बसंल
शिवाजी महाराजांचा जयजयकार करा, शिवाजी महाराज कोणाच्यातरी पोटी जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करील. सभेतून मिरवेल, एक तारणार कळप मारणार, कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं खाणार, हालसिद्धनाथांची करशीला चाकरी, तर खाशीला भाकरी, थराचा धोंडा थराला बसंल, नऊ पृथ्वी दहा खंड काशीबरोबर हाय, दहाक्या काशीत माझं दप्तर हाय, करवीर काशीत माझा “िकाण हाय, आहे ही गोसाक्याची पांढरी आहे, गोसाक्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागावं, वागू नये गर्वाने वागू नये. गर्वाने वागशीला तर फसून जाशीला, गर्वाचे घर खाली हाय.
पांढरीची राखण मी करीन
मी थोरला, तू थोरला म्हणू नकोसा, लहानाचा , मोठय़ाचा लहान होईल, हाय की हाय हा विषाचा पेला हाय हय़ो खैराचा इंगोळ आहे, वाडीकुर्लीच्या बाळांनो एकीने वागा. करशीला सेवा तर खाशीला मेवा, तुमचे दुःख माझ्या पायाशी घेऊन, माझ्या झोळीतली रिद्धीसिद्धीr तुम्हाला देईन, पोटाशी धरीन, जतन करीन, करीन पांढरीची राखण करीन.
जाळ-ताप किरम-खोकला वाढत राहील
वांग्याच्या झाडाला शिडी लावशीला, चालता बोलता माणसाचा प्राण जाईल, उशाची भाकर उशालाच राहील, माझं माझं म्हणू नका हे भरांतीचं ओझं हाय, पाण्याचा बुडबुडा हाय, पाण्याचा कप विकत मिळंल, पाळी लागंल, जाळ-ताप-किरमöखोकला आजार वाढल्यात, लाकूड सोन्याचं होईल. ताजक्यातनं विकंल. लाकडाची डोरली येतील, गाई-म्हशीला तुम्ही गहू घालशीला, रेडय़ापडय़ाला तुम्ही पंद घालशीला, धर्माचं पारडं वर हाय, गंमत बघतयं, कर्माचं पारडं खेळ करतया, आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय, पाची बोटांनी माणसानं धर्म करावा, उंदराला भिशीला खरं वाघाला भिणार नाहीसा, खडा थोडा पर घोडा जास्त सुटंल. चैत्राच्या महिन्यात गायत्री माळाला जातीला, एक रुपयं गाडीचं चकार होईल, च्या च्या म्या म्या करशीला, येईल कापाकापी, लपाछपी येईल,
डोंगराएवढं पाप, दोऱयाएवढं पुण्य
भाऊ-बहिणीचं प्रेमप्रकरण चालेल, प्रेमप्रकरणातून लग्नकार्य होईल. भाऊ-बहिणीच्या नात्याला कलंक लागेल, काळीमा फासंल, भावाला बहीण ओळखना झालीया. सासऱयाला सून ओळखना झालीया, जगात डोंगराएवढं पाप, दोऱयाएवढं पुण्य राहीलंया, दोऱयाच्या आधारे डोंगर तरलया, विचार करावा, शेषाच्या फडीवर ही धरणीमाता हाय, धरणी माता डळमळू लागलीया. करावा तुम्ही विचार करावा, ऋषिमुनींना कोडं पडलंय. वर इंद्रसभेच्या देवाचा धावा करशीला, काही वर्षानं सूर्य-चंद्र एकत्र येतील आणि दोघांची टक्कर लागंल अन् पृथ्वी गडपं होईल. आलाय पृथ्वीचा करार संपत आलाय. जगात धर्म बुडून गेलाय, सत्य फासावर गेलंय, धर्माची बाजू म्होरं हाय, चाललया जगाचं भविष्य चाललया.
जाती-पातीचं वैरत्व वाढंल
लायटाअभावी जनजीवन विस्कळून जाईल. लुटालूट होईल, भागात हालसिद्धनाथ भेटायला येईल, सुख-दुःखाच्या गोष्टी मागणं घालतील, सीमाप्रश्न राजकर्त्यांच्या चर्चेत राहील, निपाणी भागात अतिरेकी गोंधळ घालतील, होईल फायरिंग होईल, होईल जाळपोळ होईल, कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठं भगदाड पडंल. चौथाई कोना जलमय होऊन कोना वसाड पडंल. दुधाचा भाव वाढत राहील. सत्तेसाठी भांडून खेळतील. गाई-म्हशींचा भाव गगनाला भिडेल. जरीका”नेसशीला, आई-बापाला सतरा गा”ाrचा घडवूत मिळतील, जमीन ओसाड पडंल, जाती-धर्म बिघडत चाललाय, जाती-धर्मात वैरत्व वाढंल, हाणामारी होईल.
बुद्धी जास्त, पण आयुष्य कमी होईल
बैलाची किंमत बकऱयाला येईल, बकऱयाची किंमत कोंबडय़ाला येईल, कोंबडं माणसाच्या पाठी लागंल. माशापासून माणसाला आजार होतील. बारा वर्षाचं बालपण खेळत राहील, चोवीस वर्षाचं तरुणपण काबाडकष्ट करील, पस्तीस वर्षाचं म्हातारपण येईल. माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील. एका पुरुषाला सात बायका होतील, पुरुष झाडाच्या शेंडय़ावर चढून बसंल. नवऱयाला बायको थोबाडीत मारील, माळाची नदी, नदीचा माळ होईल, नदीबाईला कुलपं पडल्यात. नावबाईपाशी सतपण हाय, इजबाईचा मोठ्ठा कल्लाटा होईल, इजबाईनं मोठ्ठ नुकसान होईल, डोंगर-पर्वत वाफेने जातील, समुद्रातील संपत्ती नाश पावेल. स्मगलर लोकांची हत्या होईल. नाचतील हिजडं नाचतील.
कोरोनाला पायाखाली घेईन
चीन देश भारतावर हल्ला करंल, चालंल राज्य गुंडांचं चालंल, अतिरेकी लोक येतील, घोटाळा करून जातील, बॉम्बस्फोट होतील, दिल्लीच्या गादीला धोका व्हईल, शहरालागून असलेली शहरं खेडय़ाप्रमाणे होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडेल. अ”रा तऱहंच माणसाला आजार होतील, आडं चुकंल पण खेडं चुकणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, बारा कोसाला एक दिवा लागंल, माणसाची वसती विरळ होईल. वादळ, भूकंपानं समुद्राची उलथापालथ होईल. दुनियेचा चवथाई कोना वसाड पडंल. कोरोना किती बी वाढला तरी त्याला पायाखाली घेईन, पण लक्षात घ्या, जपून ऱहावा, पृथ्वीचा करार संपत आलाय.
भारतमातेचा जयजयकार होईल
मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही, छातीची ढाल करील, भारत-पाकिस्तान लढत राहील, पाकिस्तानचा चौथाई कोना भारतात समाविष्ट होईल, भारतमातेचा जम्मू-काश्मीरमध्ये जयजयकार होईल, भारत-पाक सीमेवर रण घुमंल, आया-बहिणींची आब्रू लुटतील, पाकिस्तान राष्ट्र उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. कामगारांना भाव येईल, मोठे लोक दारात बसतील. संप हारताळाची पाळी देशावर येईल. जंगलातील प्राणी, पक्षी गावात येतील, धुमाकूळ घालतील, गावातला माणूस भयभीत होईल, अशी सिद्धार्थ डोणे महाराज यांनी भाकणूक कथन केली.