खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची पत्रकार परिषद : आगामी काळात तालुका समिती एकीसाठी करणार प्रयत्न
वार्ताहर / खानापूर
खानापूर तालुक्मयात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जीवावर आमदार होऊन नुकताच राष्ट्रीय पक्षात प्रवेश केलेल्या माजी आमदार अरविंद पाटील यांनी समितीशी द्रोह केला आहे. याबद्दल तालुका युवा समितीच्यावतीने पत्रकार परिषदेद्वारे निषेध नोंदविण्यात आला. माजी आमदाराने समितीशी द्रोह केल्यामुळे नि÷ावंत समिती कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. पण कोणाच्या जाण्याने समितीचे नि÷ावंत कार्यकर्ते विचलित होणार नाहीत. त्यामुळे नजीकच्या काळात तालुक्मयात विभाजन झालेल्या दोन्ही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते व कार्यकर्त्यांमध्ये एकसंधपणा आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. दोन्ही समितीच्या नेत्यांनी पुनः पुन्हा विचार करून मतभेद व स्वार्थ बाजूला ठेवून केवळ ध्येय व नि÷ा जपण्यासाठी एकीच्या झेंडय़ाखाली यावे, यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंडय़ाखाली आमदारकी भोगून समितीशी प्रतारणा व द्रोह करणाऱयांना जनता चोख उत्तर देणार, यात शंका नाही. यासाठी समिती कार्यकर्त्यांनी संभ्रमावस्थेत न राहता केवळ सीमाप्रश्न व मराठी भाषा हे ध्येय ठेवून आगामी काळात समितीशी एकनिष्ठ राहावे, असे आवाहन खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील व युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी गुरुवारी पत्रकार परिषदेद्वारे केले.
मराठी फलक लावण्यासाठी तीव्र आंदोलन हाती घेणार
यावेळी बोलताना धनंजय पाटील यांनी, समिती कोणाच्या दावणीला बांधली गेली नाही. त्यामुळे कोण कुठे गेले यापेक्षा समितीची बांधिलकी व एकसंधता राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत. पुन्हा एकदा तालुक्मयात महाराष्ट्र एकीकरण समितीचे वर्चस्व सिद्ध करावे, असे आवाहन करून महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा समितीच्या माध्यमातून खानापूर तालुक्मयातून जाणाऱया बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील प्रत्येक गावच्या ठिकाणी मराठी फलक लावण्यासाठी तीव्र आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी मार्चमध्ये आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल रोजी तालुक्मयातील ज्ये÷ निवृत्त शिक्षकांचा व माजी सैनिकांचा सत्कार आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून दिग्गज नेत्यांना निमंत्रित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर पत्रकार परिषदेला युवा समितीचे पदाधिकारी सदानंद पाटील, राजू पाटील, किशोर हेब्बाळकर, किरण पाटील, विनायक सावंत, मारुती गुरव, प्रतीक देसाई यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.