क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
सदाशिवगड, कारवार येथील समीक्षा प्रकाश राणे हिने ब्लॅकबेल्ट परीक्षा उत्तीर्ण होऊन ब्लॅकबेल्ट मिळविला आहे.
समीक्षा ही गेली सहा वर्षे कराटे क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत तिने 9 सुवर्ण, 12 रौप्य, 5 कांस्य पदके मिळविली आहेत. नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिने उत्तीर्ण होत ब्लॅकबेल्ट मिळविला. तिला सिंहन सुनील एंजल यांचे मार्गदर्शन लाभत असून, राणे परिवार, सदाशिवगड नागरिकांतून तिचे कौतुक होत आहे.