16 लाखांचा मुद्देमाल जप्त ; 20 जणांवर पोलिसांकडून कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यातील सर्वात मोठय़ा मटका धंद्याचा बुकी समीर कच्छी याच्या जुगार अड्डय़ावर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. 20 जणांवर गुन्हे दाखल करून 16 लाख 26 हजार 70 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. समीर कच्छीवर केलेल्या कारवाईमुळ मटका, जुगार व्यवसायिकांचे कबंरडे मोडले आहे.
जिह्यातील मटका व्यावसायिकांचा प्रमुख समीर कच्छी त्यांच्या काळेवस्ती सैदापूर येथील राहत्या घरी कल्याण, मेन, मिलन, राजधानी, टाईम नावाचा जुगार चालवित होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना मिळाली. त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक संतोष पवार व पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे यांच्या पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने सोमवारी त्यांच्या घरी छापा टाकला.
यावेळी शमिम उर्फ समीर कच्छी (वय 42, रा. काळेवस्ती, अंगणवाडीजवळ, सैदापूर सातारा), धनंजय संपतराव कदम (वय 55, रा. 891 शनिवार पेठ सातारा), अश्विन विनायक माने (वय 45, रा.शेंद्रे ता.जि. सातारा), नासिर हुसेन दिलावर शेख (वय 40, रा. बुधवार पेठ सातारा), सलिम कादिर खान (वय 35, रा. शनिवार पेठ सातारा), शकिल कादर सय्यद (वय 51, रा. शनिवारपेठ सातारा), विष्णू काशिनाथ सोनटक्के (वय 45, मुळ रा. कोरुचीमाळ बाग इचलकरंजी ता.हातकणंगले जि. कोल्हापूर सध्या रा. काळेवस्ती, आंगणवाडी शेजारी, सैदापूर सातारा), राजेश संपत कदम (वय 53, रा. पिलेश्वरीनगर करंजे सातारा), विकास राजू चव्हाण (वय 30 वर्ष रा. शनिवार पेठ सातारा), संतोष रामचंद्र माने (वय 46, रा. कोंडवे ता. सातारा), अक्षय जोतिराम सोनावणे (वय 21, रा.मुजावर कॉलनी कराड), गजानन चंद्रकांत इरकल (वय 51, रा. शुक्रवार पेठ सातारा), किशोर दिलीप साळुंखे (वय 26, रा. माळवाडी ता. सातारा), असद वाहिद सय्यद (वय 27, रा. जगदीश्वर कॉलनी सैदापूर सातारा), असिफ बशीर खान (वय 38 वर्षे रा. शनिवार पेठ सातारा), साहील शमिम उर्फ समीर शेख उर्फ कच्छी (वय 19 वर्षे रा. काळेवस्ती सैदापूर सातारा), संतोष मोहन गुरव (वय 32, रा.काशिळ ता.सातारा), प्रकाश तानाजी बोभाटे (वय 32, रा.मुळीकवाडी ता.सातारा), श्रीकांत लक्ष्मण पाटील (वय 65, रा.पाटखळ ता.सातारा), अमर गणेश पवार (वय 20, रा.गंगासागर कॉलनी मोळाचा ओढा सातारा) हे जुगार चालविताना मिळून आले.
त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 16 लाख 26 हजार 070 रूपये किंमतीचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त करून त्यांच्याविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.