ब्रिटनमध्ये सुपरहिरोप्रमाणे उडून पोहोचले सैनिक
ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने समुद्रात पहिल्यांदाच जेट सूट परिधान केलेल्या सैनिकांदरम्यान चाचणी मोहीम साकारली आहे. यात 42 कमांडोंनी स्पीडबोटीने सुपरहिरोप्रमाणे उडून मोठय़ा नौकेवर पोहोचून त्यावर नियंत्रण मिळविले आहे. अशा मोहिमेला व्हिजिट, बोर्ड, सर्च अँड सीजर म्हटले जाते, जी अत्यंत धोकादायक मानली जाते. अशाप्रकारची मोहीम हेलिकॉप्टरने पार पडते, पण जेट सूट आल्याने सैनिक चहुबाजूने हल्ला करू शकतात.
हा जेट सूट मार्वल कॉमिक्स सीरिजच्या आयर्न मॅनच्या आर्मर सूटप्रमाणेच आहे. याची निर्मिती एअरोनॉटिक्स कंपनी ग्रॅव्हिटी इंडस्ट्रीजने केली आहे. यात विशेषप्रकारची फ्लाइट सिस्टीम आणि 5 गॅस टर्बाइन इंजिन्स आहेत. त्यांना हात आणि पाठीवर ठेवले जाते. हे सूट 1 हजार अश्वशक्तीच्या इंजिनाच्या मदतीने उड्डाण करते. सुमारे 140 किलोच्या या सूटमध्ये जेट ए-1 केरोसीन किंवा प्रीमियम डिझेलचा वापर होतो.
3.7 कोटी रुपये जेट सूटची किंमत
128 किलोमीटरच्या वेगाने उडू शकतात
12 हजार फूट उंचीपर्यंत पोहोचता येणार
आयर्न मॅनच्या आर्मर सूटसारखा जेट सूट