समुद्रात अनोख्या जीव-जंतूंसह विविध प्रकारच्या वनस्पती आणि इतर गोष्टी आढळून येतात. समुद्रातील जीवांवर संशोधन करणारे वैज्ञानिक अनेक नव्या दुर्लभ जीवांचा शोध लावत असतात. अलिकडेच समुद्रात एक असा जीव मिळाला आहे, जो अत्यंत अनोखा आहे.
रशियात एका मच्छिमाराला हा रहस्यमय जीव समुद्रात सापडला, जो पाहण्यास अत्यंत विचित्र आहे. या अनोख्या जीवाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. इंटरनेटवर लोक याला बेबी ड्रगन म्हणत आहेत. रोमन फेडोर्टसोव्ह आणि त्यांचे सहकारी मॅकरेल हे नॉर्वेयिन समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. याचदरम्यान त्यांनी हा अनोखा जीव पकडला आहे.
रशियाच्या मरमंस्क शहरात राहणारे मच्छिमार अनोख्या सागरी जीवांना अनेकदा पाहत असतात. परंतु या रहस्यमय जीवाला पाहिल्यावर ते देखील अवाप् झाले. परंतु हा अनोखा जीव आता कुठलेच रहस्य राहिलेला नाही. या जीवाचे नाव काइमेरा असून तो कार्टिलाजिनस मासा आहे. या माशाला घोस्ट शार्क देखील म्हटले जाते. रोमन यांनी या अनोख्या माशाचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.