27 पर्यंत विविध कार्यक्रम
प्रतिनिधी /म्हापसा
खोब्रावाडा कळंगूट येथील समुद्र किनारी जागृत दैवत असलेल्या श्री बाबरेश्वर देवस्थानाचा 58 व्या जत्रोत्सवाला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने पुरोहित यशवंत केळकर यांच्या अधिपत्याखाली देवस्थानचे उपखजिनदार समीर चोडणकर यांच्या यजमानपदाखाली अभिषेक, लघुरुद्र, प्रतिष्ठापना, आरती, तीर्थप्रसाद व पुरोहितानी विधीवत गाऱहाणे घालून सुरुवात झाली. देवदर्शनासाठी सकाळपासूनच भक्तगणांनी अलोट गर्दी केली होती.
गोव्याच्या लोकांचे भाग्य म्हणजे गोव्यातील श्रद्धास्थानापैकी संपूर्ण जगभरात नावाजलेले मंदिर जागृत देवस्थान असलेले खोब्रावाडा कळंगूट येथील समुद्र किनारी हाकेला पावणारा असलेल मंदिर श्रई देव बाबरेश्वराचे देवस्थानचे नाव घेतले जाते. हे मंदिर रेतीच्या आवारात परिसरात आहे. मंदिराच्या आतल्या भागात श्री देव बाबरेश्वर देवाचे झाड आहे. बाबरेशअवराची पूजा झाल्यानंतर या झाडाची आणि पेडाची पूजा केली जाते. पहिल्याच दिवशी जवळ जवळ 2 हजार घड येथे अर्पण केले जातात.
यानिमित्त सायं. 6 वा. शांताराम गोवेकर व साथी यांचा नाटय़संगीताचा कार्यक्रम सादर झाला. रात्री 8 वा. दशावतारी नाटय़प्रयोग ‘भवानी आईचा महिमा’ संपन्न झाला. तसेच आज मंगळवार दि. 22 रोजी सकाळी 10.30 वा. यजमान श्री व सौ. कांचन अर्जुन शिरोडकर (खोब्रावाडा) यांच्याहस्ते श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायं. 5 वा. निलेश गोवेकर व साथी यांचे भजन, रात्री 8 वा. केळय़ांच्या घडाची पावणी, रात्री 9 वा. ओंकार मेलोडीज ‘ऑर्केस्ट्रा’ होणार आहे.