साहित्य : 8 ब्रेड स्लाईस, 4 चमचे बटर, 4 चमचे ग्रीन चटणी, 4 समोसा, 8 कांद्याच्या गोलाकार चकत्या, 8 शिमला मिरचीचे गोलाकार काप, 1 चमचा सँडविच मसाला, सजावटीसाठीः टोमॅटो केचप, ग्रीन चटणी
कृती : दोन ब्रेड स्लाईस घेऊन त्यावर अर्धा चमचा बटर पसरवावे. नंतर त्यावर अर्धा चमचा ग्रीन चटणी पसरवावी. आता त्यातील एका बेड स्लाईसवर समोसा ठेवावा. त्यावर कांद्याची गोलाकार चकती ठेवावी. त्यावर शिमला मिरचीचे दोन गोलाकार काप ठेवून त्यावर सँडविच मसाला भुरभुरावा. आता त्यावर ग्रीन चटणी लावलेली बेडची दुसरी स्लाईस ठेवून हलक्यावर दाबावे. सँडविच ब्रेडच्या दोन्ही बाजूने बटर लावून पसरवावे. आता सँडविच टोस्टरला दोन्ही बाजूला बटर लावावे. त्याच्या मधोमध तयार बेड सँडविच ठेवून मंद आचेवर सँडविच दोन्ही बाजूने सोनेरी रंगावर परतवावे. आता तयार बेड सँडविचचे मध्यम आकाराचे भाग करून त्यावर टोमॅटो केचप आणि ग्रीन चटणी पसरवून सँडविच खाण्यास द्या.