प्रतिनिधी /फोंडा
कोविड कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विभागीय पातळीवरील सभासदांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा राज्य एक सम्राट क्लब इंटरनॅशलचे अध्यक्ष डॉ. उदय कुडाळकर आज गुरूवार 23 सप्टे. रोजी सायं. 5 वा. सम्राट क्लब बोरी येथे सदिच्छा भेट देणार असल्याची माहिती सचिव जयेश बोरकर यांनी दिली आहे. सम्राट क्लबचे राज्यात एकूण 30 क्लब विभागीय पातळीवर कार्यरत आहेत. कोविड महामारीच्या काळात सर्व क्लबांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. सर्व क्लबांना भेट देऊन विविध विषयावर सदस्याकडे थेट संपर्क साधण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देऊळवाडा बोरी येथील राघवेंद स्वामी सभागृहात होणाऱया कार्यक्रमात विभागीय अध्यक्षा राजश्री खांडेपारकर उपस्थित राहतील. विविध स्पर्धाचे वितरण करण्यात येईल.