वार्ताहर /पणजी
सम्राट क्लब पणजी आणि कला संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृती भवन मधील सभागृहात भारतरत्न लता मंगेशकर यांना त्यांनीच गायिलेल्या गीतांच्या माध्यमातून स्वरश्रद्धा?जली वाहण्यात आली.
या कार्यक्रमात नेहा आजगावकर, विभा अलगुंडगी, योगेश कामत, तन्वी वालावलकर, शिरीष लवंदे व प्रेरणा पावसकर यांनी गीते सादर केली. विशेषतः नेहा व विभा यांनी गायिलेल्या गीतांनी दाद घेतली. मानसी वाळवे यांचे निवेदन व विष्णू शिरोडकर, सुरजित थळी, दीपक मणेरीकर व प्रकाश आमोणकर यांची वाद्यवृ?द साथ रंगतदार होती. सम्राट क्लब पणजीच्या अध्यक्ष प्रेरणा पावसकर यांनी प्रारंभी स्वागतपर भाषणात लतादिदींना आदरांजली वाहिली.