ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोना व्हायरसच्या संकटात दिल्लीतील खाजगी स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व पालकांसाठी दिल्ली सरकारने आज दिलासादायक निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार, कुठल्याही खाजगी शाळा आदेशाशिवाय फी वाढवू शकणार नाहीत, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, या बरोबर या शाळांना महिन्याची फक्त ट्युशन फी घेता येणार आहे. तसेच शाळा प्रशासनाला आपल्या शिक्षकांना दर महिन्याचे वेतन पूर्ण द्यावे लागणार आहे. आणि जर कोणत्याही शाळेने या निर्णयाचे उल्लंघन केले तर शाळेवर दिल्ली स्कूल एक्ट आणि राष्ट्रीय आपदा कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली सरकारकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
दरम्यान, दिल्लीतील खाजगी शाळा आपल्या मनानुसार फी वाढवून पालकांकडून अतिरिक्त फी घेत आहेत अशा तक्रारी येत होत्या त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.