`ओबीसी’ लोकप्रतिनिधी मेळावा, ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी परिषद घेणार
प्रतिनिधी/कोल्हापूर
भारतीय राज्य घटनेने `ओबीसीं’ ना दिलेले राजकीय आरक्षण केवळ केंद्र व राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात आले आहे. याची शिक्षा `ओबीसीं’ना भोगावी लागत आहे, अशी टीका महाराष्ट्र `ओबीसी’ जनमोर्चाचे राज्य सरचिटणीस दिगंबर लोहार यांनी रविवारी येथे केली. तसेच ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकविण्यासाठी परिषद घेतली जाईल असे ही त्यांनी सांगितले.
मंगळवार पेठेतील दैवज्ञ बोर्डिंग येथे आयोजित `ओबीसी’आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्र `ओबीसी’ जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी माळकर, ज्येष्ठ नेते पी.ए. कुंभार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दिगंबर लोहार म्हणाले, `ओबीसीं’ना स्थानिक स्वराज्य संस्थां मधील राजकीय प्रतिनिधित्वाचे आरक्षण हे संविधानात्मक तरतुदीने मिळालेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाला आरक्षण विरोधी लोक सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत. त्यामुळे पुढील काळात होणाया महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधील सुमारे 58 हजार ओबीसी लोकप्रतिनिधींचे प्रतिनिधित्व धोक्यात आले आहे.
पी. ए. कुंभार म्हणाले, ओबीसींचे राजकीय आरक्षण टिकवणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर ओबीसी मध्ये होणाया सधन व सर्व सत्ताधारी वर्गाची घुसखोरी थांबवनेसाठी ओबीसींनी लढायला तयार व्हावे लागेल.
सुनिल टिपूगडे म्हणाले, ओबीसी आरक्षण मग ते राजकीय, शैक्षणिक किंवा नोकरीतील असो यामध्ये सधन वर्गाची घुसखोरी गंभीरपणे घेऊन ओबीसी एकत्र यायला हवे.
शिवाजी माळकर म्हणाल, ओबीसी लोकप्रतिनिधींनी जागरूकतेने आरक्षण समर्थानार्थ आंदोलनात सहभागी व्हावे लागेल. अन्यथा पुढील पिढÎा आपणास माफ करणार नाही. म्हणून आरक्षण समर्थक लढÎात सहभागी व्हावे.
चंद्रकांत कोवळे यांनी स्वागत केले. शितल मंडपे यांनी आभार मानले. यावेळी नामदेव सुतार, काशिनाथ माळी, सरदार झेंडे, पांडूरंग कुंभार, महादेव सुतार, अजय अकोळकर, मारूती टिपुगडे, अतुल भालकर, संजय काटकर, अशोक माळी, अशोक कोळेकर उपस्थित होते.
दिवाळीनंतर `ओबीसी‘ आजी–माजी लोकप्रतिनिधींचा मेळावा
दिगंबर लोहार म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. या संदर्भात महाराष्ट्र `ओबीसी’ जनमोर्चाचे अध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली दिवाळी नंतर आजी-माजी लोकप्रतिनिधींचा व्यापक मेळावा, तसेच दसर्यानंतर ओबीसी आजी-माजी नगरसेवकांचा व्यापक मेळावा आयोजित केला जाणार आहे.