प्रतिनिधी / मडगाव
गोव्यातील शिक्षकाना केंद्रीय गृहमंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरूद्ध शाळेत हजेरी लावण्याचा सरकारी आदेश मागे घ्यावा अशी मागणी आपण गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे केली होती. आज सरकारने सदर आदेश मागे घेऊन शिक्षकाना घरातुन ऑनलाईन वर्ग घेण्याचा आदेश काढला आहे हे महत्वाचे आहे. आता सरकारने ऑनलाईन शिक्षणासाठी ‘इंट्रानेट’ सुविधेचा वापर करावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
गोव्यातील प्रत्येक तालुका इंट्रानेट नेटवर्कने जोडला आहे. आपण मुख्यमंत्री असताना तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांनी गोव्यात इंट्रानेटचा पायलट प्रोजेक्ट राबवला होता. आज सदर सुविधेचा वापर ऑनलाईन शिक्षणासाठी सरकारने करणे गरजेचे आहे असे दिगंबर कामत यानी म्हटले आहे.
सरकारने ऑनलायन शिक्षण व्यवस्थेसाठी तातडीने पाऊले उचलणे गरजेचे आहे. शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना लागणारी उपकरणे देण्यासाठी खास योजना त्वरित जाहीर करावी. गोव्यातील काही भागात विद्यार्थी नेटवर्कच्या शोधात कित्येक किलोमीटर चालत जातात तसेच काही मुलांना नेटवर्कच्या शोधात डोंगरावर चढावे लागते हे धक्कादायक असल्याचे श्री. कामत यांनी म्हटले आहे.
गोव्यातील प्रत्येक तालुक्मयात व बहुतेक पंचायती पर्यंत इंट्रानेट सुविधा पोचली असून, ऑनलायन शिक्षणासाठी त्याचा वापर होऊ शकतो. सदर सुविधेत विनाव्यत्यय सिग्नल उपलब्ध होतो व चांगल्या दर्जाचे व्हिडीयो प्रसारण होते असे दिगंबर कामत यानी म्हटले आहे.
आपण मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीत कार्यालयात बसून सदर इंट्रानेट सुविधेद्वारे विविध तालुक्मयातील अधिकाऱयांच्या बैठका घेत होतो याची आठवण श्री. कामत यानी करुन दिली आहे. मोबाईल नेटवर्क पेक्षा इंट्रानेट सुविधा जास्त प्रभावी असून भूमिगत फायबर ऑप्टीक केबलद्वारे विणलेल्या जाळय़ामुळे सिग्नल न मिळणे वा व्यत्यय येणे असे अडथळे येत नाहीत असे श्री. कामत यांनी म्हटले आहे.