बेंगळूर : केरळमधून बेंगळूरला आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली असली तरी राज्यात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्याचा प्रस्ताव सरकारपुढे नाही, असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिली. येथे पत्रकारांशी ते बोलत होते. बोम्मनहळ्ळी येथील अर्पाटमेंटमध्ये पार्टीमुळे अनेकजणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध इस्पितळांमध्ये उपचार केले जात आहेत. त्यामुळे कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. केरळमधून कर्नाटकात येणाऱयांवर करडी नजर ठेवली जात आहे. नर्सिंग कॉलेज आणि अपार्टमेंटमध्ये अनेकांना कोरोनाची बाधा झाली आहे. नर्सिंग कॉलेजमध्ये केरळमधून आलेल्यांना संसर्ग झाला आहे. असे असले तरी खबरदारी बाळगली आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनचा प्रस्ताव नाही, असे त्यांनी सांगितले.
Previous Articleडीके लायन्स विजयी, लॉगर स्पोर्ट्सची एक्स्ट्रीमवर निसटती मात
Next Article काँग्रेसमधील 15-20 आमदार संपर्कात : नलिनकुमार कटील
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.