बेंगळूर : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे राज्यातील सरकारी कार्यालयीन कर्मचाऱयांना बायोमेट्रीक हजेरीपासून सूट देण्यात आली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून पुन्हा बायोमेट्रीक हजेरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या कर्मचारी आणि प्रशासन सुधारणा खात्याच्या सचिव एच. सी. हर्षराणी यांनी यासंबंधीचा आदेश दिला आहे. राज्यातील काही भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने संसर्ग टाळण्यासाठी 27 एप्रिल 2020 रोजी विधानसौधसह सर्व सरकारी कार्यालयांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱयांना 31 मे पर्यंत बायोमेट्रीक हजेरीपासून सूट देण्यात आली होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरला असून बायोमेट्रीक हजेरी व्यवस्था तत्काळ सुरू करण्याचा आदेश देण्यात आला आहे. शिवाय बायोमेट्रीक मशिनजवळ सॅनिटायझरची व्यवस्थाही करण्याची सूचना देण्यात आली आहे.
Previous Articleविद्यार्थ्यांच्या बसपास मुदतीत 10 डिसेंबरपर्यंत वाढ
Next Article बेंगळुरात एनआयएचे 43 ठिकाणी छापे
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.