शांतता समितीच्या बैठकीत दिली माहिती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर बकरी-ईदसाठी सरकारने काही नियमावली ठरविली आहे. या मार्गसुचीनुसार बकरी-ईद साजरा करण्यास मुभा आहे. सामुहिक प्रार्थनेला अवकाश राहणार नाही, अशी माहिती खडेबाजारचे एसीपी ए. चंद्राप्पा यांनी दिली.
खडेबाजार पोलीस स्थानकात शांतता समितीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी दस्तगीर अलवाडकर, अजीज धारवाडकर, झीया डांगे, अजीज नुराणी आदींसह शांतता समितीचे सदस्य उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातही बैठक झाली होती.
1 ऑगस्ट रोजी बकरी-ईद होणार आहे. प्रार्थना स्थळे वगळता इतर ठिकाणी प्रार्थना करण्यास निर्बंध असणार आहे. एका मशिदीत एकावेळी 50 जणांना नमाज करता येणार आहे. नागरिकांच्या आरोग्याचे हीत लक्षात घेवुन सरकारने नियमावली ठरविली असून या चौकटीत राहूनच बकरी-ईद साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले.
दारु – विक्री बंदीचा आदेश
बकरी-ईदच्या पार्श्वभूमिवर बेळगाव शहर व जिह्यात शुक्रवारी 31 जुलैच्या सायंकाळी 6 पासून शनिवारी 1 ऑगस्टच्या मध्यरात्री 12 पर्यंत मध्यविक्री बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आलाआहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी या संबंधी आदेश जारी केला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांविरुध्द कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे.