बेंगळूर
: गेल्या 14 वर्षात यंदा पहिल्यांदाच सरकारी शाळेतील प्रवेशात लक्षणीय वाढ झाली आहे, अशी माहिती प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांनी दिली. शिक्षण खात्यातर्फे रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. कोरोनामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. त्यामुळे पालक आपल्या पाल्याला सरकारी शाळेत दाखल करीत आहेत. सुमारे 90 हजार मुले सरकारी शाळेत दाखल झाली असून गेल्या 14 वर्षांतील ही लक्षणीय वाढ आहे. सरकारी शाळांच्या सबलीकरणासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवित आहेत. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना येणाऱया अडचणींवर तोडगा काढण्यासाठी इंग्रजी माध्यम शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.