साईराज क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
साईराज स्पोर्ट्स फौंडेशन आयोजित सातव्या साईराज चषक आंतरराज्य टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सरकार गांधीनगर, साईश इलेव्हन, अक्षत स्पोर्ट्स मजगाव संघांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून पुढील फेरीत प्रवेश केला. सचिन लमाणी, अनिकेत, मनोज ताशिलदार विजय नाकाडी, रमेश यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात डेपो मास्टर संघाने 8 षटकात 4 बाद 91 धावा केल्या. रोहित पाटीलने 31 तर राजूने 29 धावा केल्या. सरकार गांधीनगरतर्फे मनोज ताशिलदारने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल सरकार गांधीनगरने 8 षटकात 5 बाद 91 धावा करून सामना टाय केला. सुपरओव्हरमध्ये सरकार गांधीनगर संघाने 6 धावांनी विजय संपादन केला.
दुसऱया सामन्यात साईश स्पोर्ट्स क्लब संघाने 8 षटकात 7 बाद 109 धावा केल्या. त्यात विजय नाकाडी व विठ्ठल हंडी यांनी प्रत्येकी 27 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल फ्रेंड्स फॉरेव्हरने 8 षटकात 6 बाद 84 धावाच केल्या. त्यात विकीने 31 धावा केल्या. विजय नाकाडीने 2 गडी बाद केले. तिसऱया सामन्यात अक्षत स्पोर्ट्सने 8 षटकात 7 बाद 114 धावा केल्या. सचिन लमाणीने 49 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल डेपो मास्टर ब संघाने 8 षटकात 6 बाद 66 धावाच केल्या. चौथ्या सामन्यात साईश स्पोर्ट्स क्लब संघाने 7.5 षटकात सर्व बाद 50 धावा केल्या. सरकारच्या अनिकेतने 13 धावात 4 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल सरकार गांधीनगर संघाने 2.5 षटकात बिनबाद 51 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. संजय यादवने 28 तर अभिषेकने 22 धावा केल्या. पाचव्या सामन्यात अयोध्या कडोलीने 7.5 षटकात सर्व बाद 57 धावा केल्या. त्यात सुशांत पाटीलने 17 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल अक्षत स्पोर्ट्सने 5.1 षटकात 2 बाद 58 धावा करून सामना 8 गडय़ांनी जिंकला. त्यात शेखरने 27 धावा केल्या.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे शीतल वेसणे, प्रशांत कलघटकर, अखिल बॉम्बेवाले, हेमंत आंबेवाडी, मन्सुर तोडीवाले, सिद्दानी स्वामी, अभिषेक शेट्टी, जोतिबा गिलबिले, जोतिबा शहापूरकर, चंदन यांच्याहस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
मंगळवारचे सामने – 1) मोईन बॉईज वि. मैत्री स्पोर्ट्स माणगाव, सकाळी 9 वा. 2) इंडियन बॉईज मारिहाळ वि. अलोन स्पोर्ट्स मुंबई, स. 10.30 वा., 3) डिंगडॉंग वि. राजमुद्रा स्पोर्ट्स क्लब मंडोळी, दुपारी 12 वा., 4) पहिल्या सामन्यातील विजेता वि. दुसऱया सामन्यातील विजेता, दुपारी 1.30 वा. 5) बालाजी स्पोर्ट्स वि. चॅलेंजर बॉईज, दु. 3 वा.