ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबईतल्या वडाळा येथील ट्रक टर्मिनस येथे वस्तू व सेवा कर भवनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी राजकीय टोलेबाजीही केली. महाविकास आघाडी कोसळणार अशी भाकितं करणाऱ्या भाजपला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने जोरदार टोला लगावला. काहीजण महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मनात गुढ्या उभा करत आहेत अशी खोचक शब्दात टीका केली.
मुंबईतल्या वडाळा येथील ट्रक टर्मिनस येथे वस्तू व सेवा कर भवनाच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन आज होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. अनेकजण सरकार पाडण्याच्या गुढ्या मनात उभारत आहेत, असा टोला मुख्यमंत्री ठाकरेंनी लगावला. तसेच राज्यात सुरु असणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवर देखीलयावेळी तिन्ही भाष्य केलं.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले की, “राज्यात एक वातावरण तयार केलं जात आहे. सरकारमध्ये कुठे तरी रुसवे फुगवे सुरु आहेत, तसं काहीच नाही आहे पण आपण हे सरकार स्थापन केलं त्याचं नाव महाविकास आघाडी ठेवलं आहे. महाविकास हा नुसता नावामध्ये नाही आहे, तो प्रत्यक्षात आपण जमिनीवर अंमलात आणतोय,” असं मुख्यमंत्री म्हणाले.