नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश शरद बोबडे 23 एप्रिल रोजी निवृत्त झाले. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने त्यांना निरोप देण्यात आला. देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून त्यांनी या पदावर 1 वर्ष 5 महिने काम केले. आता त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयातील वरि÷ न्यायाधीश व्ही. एन. रमणा यांची नियुक्ती होणार असून ते शनिवार, 24 एप्रिल रोजी सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.
बोबडे यांनी आपल्या कार्यकाळात दीर्घ काळ न्यायालयात प्रलंबित असलेल्या राम जन्मभूमी प्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला होता. अयोध्या प्रकरणी नेमल्या गेलेल्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठात त्यांचा समावेश होता. 29 मार्च 2002 रोजी शरद बोबडे यांची मुंबईच्या उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. 12 एप्रिल 2013 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 18 नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती.
………..