ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
अयोध्या राम जन्मभूमी प्रकरणात नेमल्या गेलेल्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठात सहभाग असलेले सरन्यायाधीश शरद बोबडे आज (दि.23) निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश व्हीएन रमण उद्या (24 एप्रिल) सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत.
बोबडे देशाचे 47 वे सरन्यायाधीश आहेत. त्यांनी या पदावर 1 वर्ष 5 महिने काम केले. बोबडे यांची 29 मार्च 2002 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती. 12 एप्रिल 2013 मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. 18 नोव्हेंबर 2019 मध्ये त्यांची सरन्यायाधीश म्हणून नेमणूक झाली होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायालयीन सुनावण्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहेत. त्यामुळे बोबडे यांचा निरोप समारंभ अशाच प्रकारे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार असल्याचे सांगण्यात येते.