क्रीडा प्रतिनिधी /मडगांव
सारस्वत स्पोर्ट्स संघ चॅरिटेबल ट्रस्टने आयोजित केलेल्या सरसांगण टी-10 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेतील अंतिम लढत मडगाव मेगास्ट्रायकर्स आणि अंत्रुज युनायटेड संघात होईल. काल मळकर्णे येथील एस. के. मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या उपान्त्य सामन्यात अंत्रुज जीएसबी परिवार संघाला मडगव मेगास्ट्रायकर्सने 9 विकेट्सनी पराभूत केले तर दुसऱया उपान्त्य लढतीत अंत्रुज युनायटेडने मांडवी आर्यन्सचा 22 धावानी पराभव केला.
संक्षिप्त धावफलकः अंत्रुज जीएसबी परिवार, 10 षटकात 9 बाद 57 (प्रथम कोसंबे 15 धावा. विनय सांबारी 2-18, बाळकृष्ण होडारकर 2-9, व्यंकी 2-4) पराभूत विरूद्ध मडगाव मेगास्ट्रायकर्स, 6.3 षटकात 1 बाद 58 (अखिल गायतोंडे नाबाद 11, दुर्गेश प्रभुगावकर 26, आदित्य आंगले नाबाद 10 धावा). सामनावीर- दुर्गेश प्रभुगावकर (मडगाव मेगास्ट्रायकर्स).
अंत्रुज युनायटेड, 10 षटकात 8 बाद 103 (कपिल बोरकर 25, विशाल कामत 30, प्रणव बिचे 10, अथर्व मोपकर 13 धावा. सचिन सरदेसाई 2-11, मनीष काकोडे व विभव पै प्रत्येकी एक बळी) विजयी विरूद्ध मांडवी आर्यन्स, 10 षटकात 6 बाद 81 (सुदिन कामत 11, साहिश म्हांबरे 25, राजाराम कुंडईकर 13 धावा. सिधीत रायतूरकर 2-7, सिद्धार्थ घाणेकर, विक्रांत प्रभू, अनीश खांडेपारकर प्रत्येकी एक बळी). सामनावीर- विशाल कामत (अंत्रुज युनायटेड).