चित्रपटातील कलाकारांचा ‘ग्रामविकास’कडून सत्कार
प्रतिनिधी / विजयदुर्ग:
अभिनेता, लेखक व दिग्दर्शक प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला विजयदुर्ग किल्ला व परिसरात बुधवारपासून सुरुवात करण्यात आली. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्यावतीने श्ा़खाr. तरडे यांच्यासह चित्रपटातील कलाकार अभिनेता गश्मीर महाजनी, उपेंद्र लिमये यांच्यासह सिनेमॅटोग्राफर महेश लिमये आदी कलाकारांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला.
बहुचर्चित ‘सरसेनापती हंबीरराव’ या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण विजयदुर्ग किल्ला व परिसरात सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्यासह चित्रपटातील कलाकारांनी विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या कार्यालयात भेट दिली. यावेळी ग्रामविकास मंडळ व विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने या सर्व कलाकारांचे स्वागत करण्यात आले. यावेळी अविनाश गोखले, राजेंद्र परुळेकर, शरद डोंगरे, योगिता परुळेकर, कु. सानिका जावकर, सिद्धेश डोंगरे, विनायक चोडणेकर, राकेश पाटील, सरपंच प्रसाद देवधर, विजयदुर्ग पोर्ट ट्रस्ट ऑफिसचे श्री. पाटील आदी उपस्थित होते. ग्रामविकास मंडळ आणि विघ्नहर्ता ग्रुपच्यावतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. तसेच विजयदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती देऊन गौरविण्यात आले.