60 फूट रस्त्याची रुंदी असल्याचे ग्रामपंचायतीचे म्हणणे
वार्ताहर /किणये
बेनकनहळळ्ळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सरस्वतीनगरमध्ये काही जणांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र, यामुळे सरस्वतीनगरात तणावाचे वातावरण पसरले आहे.
सरस्वतीनगरात झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामीणच्या आमदारांचे पाठबळ मिळाले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
सदर रस्ता हा सरस्वतीनगर, पार्वतीनगर, महालक्ष्मीनगर, सैनिकनगर आदी नगरांसह अंगडी इन्स्टिटय़ूटलाही उपयोगी पडणारा आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांपासून रस्ता अरुंद बनला आहे. याचा स्थानिक नागरिक व वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रतिक्रिया या भागातील नागरिकांतून व्यक्त होत आहेत.
रस्त्याच्या रुंदीकरणाबद्दल सरस्वतीनगरातील नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी या परिसराची पाहणी करून योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे.