प्रतिनिधी /बेळगाव
सरस्वती वाचनालय शहापूर व स्वरमल्हार फौंडेशन बेळगाव यांच्यातर्फे दि. 24 रोजी ‘गुरुपौर्णिमा संगीत सभा’ आयोजित केली आहे. वाचनालयाच्या सभागृहात सकाळी 9 ते 12 व सायंकाळी 5 ते 8 अशा दोन सत्रात ही सभा होईल. सकाळच्या सत्रात नंदन हेर्लेकर, रोहिणी कुलकर्णी, प्रभाकर शहापूरकर यांचे गायन, डॉ. सुधांशु कुलकर्णी आणि सारंग कुलकर्णी यांचे संवादिनी वादन होणार आहे.
सायंकाळच्या सत्रात श्रीधर कुलकर्णी, राजप्रभू धोत्रे, मुकुंद गोरे यांचे गायन, रविंद्र माने यांचे संवादिनी वादन, संजय देशपांडे यांचे सतार वादन होणार आहे. सर्व कलाकारांना चिदंबर तोरगी, अंगद देसाई, संतोष पुरी, वैभव गाडगीळ व योगेश रामदास हे साथ करणार आहेत. दोन वर्षे कोरोनामुळे अनेक आप्त गमावले. हे दुःख पचवून मनाला उभारी देणारे एकच क्षेत्र म्हणजे कलाक्षेत्र. त्यातही संगीत कलेला उच्च स्थान आहे. म्हणूनच बेळगावचे कलाकार गुरुप्रती असलेली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी या संगीत सभेत एकत्र येत आहेत. कोविडचे नियम पाळून सर्वांनी मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.