बेळगाव / प्रतिनिधी
द. म. शि. मंडळ संचालित सरस्वती हायस्कूल हंदिगनूर येथे नुकताच पालक मेळावा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निंगोजी हुद्दार होते. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी स्वागत केले.
कोरोनाविषयी पालकांचे कर्तव्य, विद्यार्थ्यांचे कर्तव्य याविषयी पी. आर. पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. सर्व विषयांच्या अभ्यासाविषयी, परीक्षेविषयीचा आत्मविश्वास कसा वाढवावा याबद्दल विचारविनियम करण्यात आला. याप्रसंगी शाळा सुधारणा कमिटीचे निंगोजी हुद्दार, उपाध्यक्ष पी. जी. पाटील, हायस्कूलचे शिक्षक एस. एफ. पाटील, राजू वर्पे, कल्लाप्पा पाटील यांनी विचार व्यक्त करून पालकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अनिता चौगुले, गंगाधर पाटील, शट्टुप्पा रामणकट्टी, एम. एन. पाटील, देवेंद्र भादुर्गे, भरमू सुतार, राजू पाटील, शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य, पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन जे. जी. कदम यांनी तर जी. एस. पाटील यांनी आभार मानले.