प्रतिनिधी / बेळगाव
गणपत गल्ली येथील महाबळेश्वर सेजेकान यांना सोन्याची मागणी करून त्रास देणाऱया बेंगळूर पोलिसांवर कारवाई करावी, या मागणीसाठी शुक्रवारी बेळगावातील सराफी पेढी बंद ठेवून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले.
गुरुवारी सकाळी गणपत गल्ली येथील सिद्धीविनायक ज्वेलर्स येथे केए 04 9699 या इनोव्हामधून आलेले कांहीजण आम्ही बेंगळूर पोलीस असून दहा तोळे सोन्याची मागणी महाबळेश्वर सेजेकान यांच्याकडे करीत बळजबरीने गाडीत बसण्यास सांगितले. त्यावरून महाबळेश्वरांवर मानसिक ताण येऊन त्यांची प्रकृती खालावली. महाबळेश्वर हे गेले अनेक वर्षे सराफी व्यवसायात असून ते कर्नाटक दैवज्ञ स्कूलचे चेअरमन, त्याचप्रमाणे दैवज्ञ ज्वेलर्स संघटनेचे सल्लागार आहेत. अशा प्रति÷ित सराफीवर वारंवार या प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. त्या निषेधार्थ बेळगावच्या सराफी दुकानदारांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्याचे बैठकीत ठरविले. शुक्रवारी सकाळी सर्व सराफी दुकाने बंद ठेवून सराफी व्यापाऱयांनी अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्याकडे निवेदन दिले. वारंवार या घटना घडत आहेत. तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी. कोरोनाच्या काळात दोन वर्षे सोनारपेढय़ा बंद पडल्याने आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. पण आता दुकाने खुली झाली असताना अशाप्रकारे सराफी दुकानदारांना त्रास सहन करावा लागत आहे, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी बेळगाव सराफी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष दयानंद कारेकर, मिहीर पोतदार, निशिल पोतदार, प्रकाश राजमाने, मिलिंद सांबरेकर, नितीन चिकोर्डे, गजानन शिंदे, मिलिंद सांबरेकर, दैवज्ञ संघटनेचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर आदी उपस्थित होते.