वृत्तसंस्था/ डब्लिन
चालू महिन्याच्या अखेरीस इंग्लंड विरुद्ध होणाऱया तीन सामन्यांच्या वन डे मालिकेसाठी आयर्लंडने सराव शिबिराकरिता 21 जणांचा संघ जाहीर केला आहे. हे शिबिर साउदम्पटन येथे घेतले जाणार आहे.
आयर्लंड संघाला साउदम्पटनला सराव शिबिराकरिता प्रवास करावा लागेल. दरम्यान, कोरोना संदर्भातील सर्व खबरदारीचे उपाय आणि नियमावली पाळावी लागेल. सदर सराव शिबिर दोन सत्रामध्ये घेतले जाणार असून यामध्ये दोन सरावाचे सामने खेळविले जातील, अशी माहिती क्रिकेट आयर्लंडच्या प्रवक्त्याने दिली. या सराव शिबिरानंतर वन डे मालिकेसाठी चौदा जणांचा अंतिम संघ घोषित केला जाईल. उर्वरित सात खेळाडू राखीव म्हणून ठेवले जातील. तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला 30 जुलैपासून प्रारंभ होईल. या मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 1 आणि 3 ऑगस्ट रोजी खेळविला जाईल.
आयर्लंड संघ- अँड्रय़ू बेलबिरेनी (कर्णधार), पॉल्स स्टर्लिंग (उपकर्णधार), मार्क ऍडेर, कर्टिस कॅम्पर, पीटर चेस, गॅरेथ डिलेनी, जॉर्ज डॉकरेल, जोनाथन गॅरेथ, टिरोनी केन, जोश लिटल, अँड्रय़ू मॅकब्रीने, बॅरी मॅपेथी, जेम्स मेकॉलम, केव्हिन ओब्रायन, विलियम पोर्टरफिल्ड, बॉईड रेनकिन, सिमी सिंग, हॅरी टेक्टर, लॉरकेन टकेर, गॅरी विल्सन आणि पेग यंग.