चेन्नई : 2021 आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सराव शिबिरात दाखल होण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे येथे आगमन झाले. चेन्नई सुपरकिंग्सच्या सराव शिबिराला 9 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. चेन्नईत दाखल झाल्यानंतर धोनी 5 दिवस क्वारन्टाईन असेल. या सराव शिबिरात दाखल होण्यासाठी भारताचा माजी फलंदाज अंबाती रायडूचेही येथे आगमन झाले आहे.
कोरोना समस्येमुळे सदर शिबिर विविध सत्रामध्ये घेतले जाणार असून क्रिकेटपटूंसाठी या शिबिरापूर्वी पाच दिवसांसाठी सक्तीचे क्वारंटाईन असणार आहे.