वृत्तसंस्था/ लंडन
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱयावर आला आहे. पुढील आठवडय़ात उभय संघातील टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी शुक्रवारी सरावाच्या सामन्यात पावसाचा अडथळा आला.
इंग्लंड दौऱयासाठी ऑस्ट्रेलियाचा 21 जणांचा संघ घोषित करण्यात आला. साऊदम्पटन येथे 4 सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळविला जाईल. या मालिकेनंतर उभय संघात तीन सामन्यांची वनडे मालिका मँचेस्टर येथे 11 सप्टेंबरपासून खेळविली जाईल. गेल्या मार्चनंतर ऑस्ट्रेलियन संघाला या इंग्लंडच्या दौऱयात खेळण्याची संधी मिळत आहे. कोरोना महामारीमुळे जवळपास 5 महिन्यांच्या कालावधीत क्रिकेटपटूंना सरावही करता आला नव्हता. शुक्रवारी झालेल्या पहिल्या सरावाच्या सामन्यात केवळ 5.5 षटकांचा खेळ होऊ शकला. पावसामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला सरावापासून वंचित रहावे लागले.