वृत्तसंस्था/ लिंकॉइन
न्यूझीलंडच्या दौऱयावर गेलेल्या भारत अ संघाने शुक्रवारी पहिल्या सरावाच्या सामन्यात न्यूझीलंड इलेव्हन संघाचा 92 धावांनी पराभव केला. या सामन्यात भारत अ संघातील फलंदाजांना सरावाची चांगली संधी मिळाली.
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यात वनडे मालिका सुरू होण्यापूर्वी सरावाचे दोन सामने आयोजित केले आहेत. शुक्रवारच्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारत अ संघाने 50 षटकात 8 बाद 279 धावा जमविल्या. त्यानंतर न्यूझीलंड अ संघाचा डाव 41.1 षटकात 187 धावात आटोपला.
भारत अ संघाच्या डावात कर्णधार शुभम गिलने 66 चेंडूत 7 चौकारासह 50 धावा जमविताना. सलामीच्या ऋतुराज गायकवाड समवेत दुसऱया गडय़ासाठी 89 धावांची भागिदारी केली. गायकवाडने 103 चेंडूत 93 धावा फटकाविल्या. सूर्यकुमार यादवने 2 षटकार आणि 4 चौकारासह 48 चेंडूत 50 धावा जमविताना गायकवाड समवेत 89 धावांची भागिदारी केली. कृणाल पांडय़ाने 31 चेंडूत 41 तर संजू सॅमसनने 4 आणि विजय शंकरने 13 धावा जमविल्या.
प्रत्युत्तरादाखल खेळताना न्यूझीलंड इलेव्हन संघाच्या डावाला बऱयापैकी सुरूवात झाली. जेकॉब आणि जॅक बॉयले यानी सलामीच्या गडय़ासाठी 82 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर खलील अहमद आणि मोहम्मद सिराज यांच्या भेदक माऱयासमोर न्यूझीलंड इलेक्हन संघाचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. भुलाने 50 तर बॉयलेने 42 धावा जमविल्या. खलील अहमदने 43 धावात 4 तर मोहम्मद सिराजने 33 धावात 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक- भारत अ – 50 षटकात 8 बाद 279, न्यूझीलंड इलेव्हन 41.1 षटकात सर्वबाद 187.