वृत्तसंस्था / न्यूयॉर्क
31 ऑगस्टपासून येथे अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेपूर्वी 20 ते 28 ऑगस्ट दरम्यान येथील बिली जिन किंग नॅशनल टेनिस सेंटरमध्ये आयोजित केलेल्या सरावाच्या टेनिस स्पर्धेत ब्रिटनचा माजी टॉप सीडेड आणि तीनवेळा ग्रॅण्ड स्लॅम जेतेपद मिळविणारा अँडी मरे सहभागी होणार आहे.
सदर सराव स्पर्धा सिनसिनॅटी येथे भरविली जात असे पण सध्या कोरोना समस्येमुळे सदर स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये घेतली जाणार आहे. या स्पर्धेसाठी अँडी मरे आणि चार अन्य टेनिसपटूंना वॉईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे. 2008 आणि 2011 साली मरेने सिनसिनॅटी टेनिस स्पर्धा जिंकली होती. यावेळी या स्पर्धेत मेदव्हेदेव, जोकोव्हिक, डिमिट्रोव्ह, सिलीक आणि नादाल हे अव्वल टेनिसपटू सहभागी होणार आहेत.