नवी दिल्ली
कोरोना महामारीमुळे उद्योग जगतावर मोठय़ा प्रमाणात परिणाम झाला असून कर्मचाऱयांच्या सरासरी वेतनाची टक्केवारी ही 2020 मध्ये 3.6 टक्के इतकी घसरली आहे. या संदर्भात एक सर्व्हेक्षण नुकतेच करण्यात आले होते. यंदाच्या वषी सरासरी वेतनात वाढ करण्याचे प्रमाण गेल्या दशकभरात सर्वात कमी नोंदले गेले आहे. 2019 मध्ये सरासरी वेतन वाढ ही 8.6 टक्के होती. दहा कंपन्यांचे सर्व्हेक्षण केले असता त्यातील चार कंपन्यांनी 2020 मध्ये वेतन वाढ काही अंशी दिली असल्याचे समोर आले आहे.