नवजात काही दिवस रुग्णालयातच राहणार
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि पॉप सिंगर निक जोनास सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहेत. यासंबंधीची माहिती प्रियंकाने स्वतःच शुक्रवारी रात्री उशिरा सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. प्रियंकाला कन्यारत्न झाल्याचे अमेरिकेतील वेबसाइट युएस वीकलीकडून सांगण्यात आले.
प्रियांकाच्या मुलीचा जन्म दक्षिण कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात झाला आहे. प्री-मॅच्योर डिलिव्हरीमुळे नवजाताला काही दिवस रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. सरोगसीद्वारे आमच्या जीवनात एका नवजाताचे स्वागत करत आहोत. या विशेष काळात आमच्या खासगीत्वाची काळजी घ्या अशी विनंती करत असल्याचे प्रियांकाने स्वतःच्या पोस्टमध्ये नमूद पेले आहे.
प्रियांकाने ‘द जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ शोदरम्यान बेबी प्लॅनिंग करत असल्याची माहिती दिली होती. प्रियांका आणि निक यांनी 2 डिसेंबर 2018 रोजी उदयपूर येथे हिंदू तसेच ख्रिश्चन पद्धतीने विवाह केला होता.