प्रतिनिधी/ बेळगाव
पाटील गल्ली येथील शनिमंदिर येथे आलेल्या घुबडाला पकडून सर्पमित्राने जीवदान दिले आहे. शहापूर येथील अक्षय हुंदरे या सर्पमित्राने या घुबडाला पकडून वनविभागाच्या अधिकाऱयांकडे सुपूर्द केले.
शनिमंदिर येथे शनिवारी सकाळी 10 च्या सुमारास एक घुबड येऊन बसले होते. बराच वेळ ते न गेल्याने अखेर मंदिराचे सभासद विक्रम आनंदाचे यांनी अक्षय यांना फोन करून माहिती दिली. घुबडाबद्दल अनेक गैरसमज असल्याने मंदिरात येण्यास भाविक घाबरत होते. अखेर अक्षय यांनी त्या घुबडाला पकडून वनविभागाच्या स्वाधीन केले.