अर्ध्या तासात रक्त केले उपलब्ध
बेळगाव : सर्पमित्र आनंद चिट्टी यांच्यावर बेळगाव येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांना 5 युनिट रक्ताची आवश्यकता भासली. यावेळी सर्पमित्रासाठी फेसबुक प्रेंड्स सर्कल धावून गेले असून अवघ्या 30 मिनिटांमध्ये रक्ताचा पुरवठा केला. रक्ताची गरज भासल्याने फेसबुक प्रेन्ड्स सर्कलचे संतोष दरेकर, प्रा. भरमा कोलेकर, राहुल चिकोर्ड व रुग्णवाहिका चालक गणेश रोकडे धावून आले. त्यांनी रक्तदात्यांना संपर्क साधला. आनंद शाह, विनायक रायचन्नावर, निखिल बाळेकुंद्री, अजनास सय्यद, हितेश खोडा यांनी त्वरित रक्तदान करून रक्त उपलब्ध करून दिले. अवघ्या 30 मिनिटांमध्ये रक्त उपलब्ध करून देण्यात आले. तसेच रालिया मोहरे या रुग्णालाही रक्ताची आवश्यकता असल्याने चेतन बागी यांनी रक्तदान केले. रक्त उपलब्ध करून दिल्याने आनंद चिट्टी यांच्या कुटुंबीयांकडून फेसबुक प्रेन्ड्स सर्कलचे आभार मानण्यात आले.