वृत्तसंस्था/ बेलग्रेड
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या बेलग्रेड खुल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या टॉप सीडेड जोकोविचने एकेरीची उपांत्य फेरी गाठताना आपल्याच देशाच्या केमेनोव्हिकचा पराभव केला.
शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचने केमेनोव्हिकचा 6-1, 6-3 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. जोकोविचने 2009 साली आणि 2011 साली ही स्पर्धा जिंकली होती. गेल्या फेब्ा्रgवारीमध्ये जोकोविचने ऑस्ट्रेलियन गॅण्ड स्लॅम टेनिस स्पर्धा जिंकली होती. जोकोविचने आतापर्यंत 18 ग्रॅण्ड स्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. गेल्या आठवडय़ात मोनॅको येथे झालेल्या स्पर्धेत ब्रिटनच्या इव्हान्सने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकोविचला पराभवाचा धक्का दिला होता.