माद्रीद
सर्बियाचे फुटबॉल प्रशिक्षक 71 वर्षीय रॅडोमीर ऍन्टीक यांचे सोमवारी दीर्घकालीन आजाराने निधन झाले. आपल्या फुटबॉल प्रशिक्षकाच्या कारकीर्दीत त्यानी ऍटलेटिको माद्रीद, रियल माद्रीद आणि बार्सिलोना या फुटबॉल क्लबना बहुमोल मार्गदर्शन केले होते. गेल्या काही दिवसांपासून ऍन्टीक असाध्य रोगाने आजारी होते. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना त्यांच्या कुटुंबियानी एका खासगी रूग्णालयात दाखल केले होते. 1978 साली ऍन्टीक स्पेनमध्ये दाखल झाले. त्यानंतर त्यांनी ऍटलेटिको माद्रीद संघाला 1995 आणि 2000 साली प्रशिक्षक या नात्याने मार्गदर्शन केले. 2002-03 या कालावधीत ते बार्सिलोना संघाचे प्रमुख प्रशिक्षक होते.
सर्बियाच्या फुटबॉल फेडरेशनतर्फे तसेच ऍटलेटिको माद्रीद, रियल माद्रीद आणि बार्सिलोना क्लबतर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.