चेअरमन किरण ठाकुर यांचे मत : आरपीडी कॉलेजचा वार्षिक दिन उत्साहात
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांनी कला, क्रीडा, स्पर्धात्मक परीक्षा, पत्रकारिता, तंत्रज्ञान, कृषी यासह विविध क्षेत्रांमध्ये आपले कौशल्य सिध्द करावे व शिक्षकांनी त्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती द्यावी, असे मत एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी व्यक्त केले. आरपीडी कॉलेजच्या वार्षिक दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते.
प्रारंभी शारदास्तवन झाले. डॉ. चंद्रशेखर मुन्नोळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले व शैक्षणिक उपक्रमांचा अहवाल सादर केला. शारीरिक प्रशिक्षक रामकृष्ण एन. यांनी पुरस्कार विजेता विद्यार्थ्यांची माहिती दिली. पाहुण्यांच्या हस्ते प्राविण्यप्राप्त विद्यार्थी रेवती जाधव, अमिना शेख, माधुरी बागवे, प्रशांत कोलकार, गंगाधर कोलकार, सनी मयेकर, रॉस्टन डिसोजा, रेणूका दासन्नावर, पार्थ पाटील, संजना नाईक, सिध्दांत जोशी, प्रथमेश कामत, मिनाक्षी नाईक या विद्यार्थ्यांना भेटवस्तु व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर आरपीडी कॉलेजच्या व्हा. चेअरपर्सन माधुरी शानभाग, संचालिका बिंबा नाडकर्णी, प्राचार्या डॉ. शोभा नाईक, विद्यार्थी कौन्सिलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर मुन्नोळी, शारीरिक प्रशिक्षक रामकृष्ण एन., कॉमर्स विभाग प्रमुख एस. एस. शिंदे, प्रा. सविनय शिवनगौडर, विद्यार्थी प्रतिनिधी अमिना शेख, विद्यार्थिनी प्रतिनिधी माधुरी बागवे, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन डॉ. हरिष कोलकार उपस्थित होते.