पेडणे मतदारसंघाचे मगो नेते यांचा आज वाढदिवस या निमित्ताने रक्तदान शिबिराचे , विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी /पेडणे
सर्व दानात रक्तदान हे सर्वात श्रेष्ट दान आहे ,प्रवीण आर्लेकर यांनी पेडणे मतदारासंघात लोकांच्या समस्या जाणून घेऊन ते सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोविड महामारीतही पेडणेतील नागरिकांना ऑक्सिजन , स्टिमर , कडधान्ये अनेकांना मदतीचा हात दिला आहे.आता आपल्या वाढदिनी रक्तदान शिबिर आयोजित करुन जीवनदान देण्यासाठी जे कार्य केले हे कार्य महान आहे असे प्रतिपादन मगो प्रवक्ते उमेश तळवणेकर यांनी मालपे येथे केले.
पेडणे मतदारसंघाचे मगो नेते आणि समाजसेवक प्रवीण आर्लेकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी उमेश तळवणेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पेडणे मतदारसंघाचे मगो नेते प्रवीण आर्लेकर, मगो कार्यकारिणी सदस्य सुदिप कोरगावकर, डा.दिनेश परब, नरेश कोरगावकर, परिचारिका सुलोचना गावस , पल्लवी शेटय़ आदी उपस्थित होते.
बाबूने वीस वर्षे पेडणेकरांचे रक्त शोषण केलेः उमेश तळवणेकर
उमेश तळवणेकर बोलताना पुढे म्हणाले या भागाचे आमदार बाबू आजगावकर रे गेली वीस वर्षे पेडणेकरांचे रक्त शोषण करण्याचे काम करत आहेत. माञ प्रवीण आर्लेकर याःना पेडणेकरांसाठी आपले रक्त देण्यासाठी हा उपक्रम केला त्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. लोकांच्या जमीनी घेऊन लोकांच्या जमिनीवर नको असलेले प्रकल्प ते आणत आहेत पेडणेचा विकास करतो म्हणून तो सांगत आहेत .क?सिनो सारख्या गोष्टीना ते समर्थन देत असून लोकांना नको असलेले गेंमलिंग झोन आणत आहेत. सहापदरी रस्ता आणूनजामिनी घशात घालण्याचे काम करत आहेत. अशा आमदाराला येत्या निवडणूकीत धडा शिकवा असे आवाहन उमेश तळवणेकर यांनी केले.
पेडणेकरांसाठी आपले नेहमीच योगदान असणारः प्रवीण आर्लेकर
यावेळी बोलताना प्रवीण आर्लेकर म्हणाले, आपण गेली दोन वर्षे पेडणेतील जनतेसाठी कार्य करत आहे.यापुढेही आपण पेडणेकरांचा समसस्या सोडविण्यासाठी नेहमीच पुढे आसणार असे सांगितले .
रक्तदान शिबिरांचे आयोजन करावेः डॉ.दिनेश परब
यावेळी बोलताना आझिलो इस्पितळाचे डॉक्टर दिनेश परब म्हणाले की, आज प्रवीण आर्लेकर यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करुन एक चांगले कार्य केले आहे. गरजवंतांना रक्त लागते त्यासाठी ते उपलब्ध असणे गरजेचे असते. इतरांनीही अशा प्रकारे रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन दुसऱयाचा जीव वाचविण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ.दिनेश परब यांनी केले.
यावेळी सुदिप कोरगावकर यांचेही समयोचित भाषण झाले.
स्वागत व प्रास्तविक सुदिप कोरगावाकर यांनी केले.सूञसंचालन महादेव गवंडी तर आभार राजन म्हापसेकर मानले. ड़ रक्तदान शिबिरा नंतर मगो नेते प्रवीण आर्लेकर यांनी नानेरवाडा येथील वृध्दाश्रमाला भेट देऊन तेथील उपस्थित नागरिकांना कडधान्ये भेट देऊन वध्दाच्यासोबत केक कापून साजरा केला. तुये व कासरवर्णे येथील आरोग्य केंद्रातील रुग्णांची भेट घेऊन विचारपूस करुन रुग्णांना आणि डॉक्टर्स व इतर कर्मचारी यांना फळाचे वाटप केले.