आरोग्य कर्मचाऱयांच्या सुटय़ा रद्द : तयारीला गती
लखनौ : देशात कोरोना लसीकरणाला सुरूवात करणारे उत्तर प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे. उत्तर प्रदेशात त्यादृष्टीने हालचालींना वेग आला असून त्या पार्श्वभूमीवर सर्व आरोग्य कर्मचाऱयांच्या सुट य़ा रद्द केल्या आहेत. चालू आठवडय़ापासून जानेवारी अखेरपर्यंत सुट्टय़ा रद्द करून पूर्णपणे लसीकरण मोहीमेवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे, असे म्हटले आहे. या मोहीमेंतर्गत आरोग्य कर्मचाऱयांना प्रशिक्षण देऊन पूर्णपणे मोहीमेच्या कामात गुंतवले जाणार आहे.
उत्तर प्रदेशच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून कोरोनाविरोधी लसीकरण मोहीमसंबधी 1 परिपत्रक जारी केले आहे. यामध्ये लसीकरण मोहीमेंतर्गत 20 डिसेंबर ते 21 जानेवारी या काळात विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचा उल्लेख आहे. आरोग्य कर्मचाऱयांचे यासाठी सहकार्य आवश्यक असल्यामुळे पूर्ण विचाराअंती सर्व सरकारी कर्मचारी, नर्सेस, कंत्राटी कर्मचारी आणि रोजंदारी कामगारांच्या सुट्टय़ा 31 जानेवारीपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. कोरोनाची लस साठवण्याबरोबरच ती कशाप्रकारे द्यायची याबाबतचे व्यवस्थापन सध्या सुरू असून संबंधित वैद्यकीय कर्मचाऱयांना त्यासाठी तांत्रिक प्रशिक्षण दिले जात आहे.